बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भिवंडी तालुक्यातील खलिंग खुर्द गावात पादचारी पूल उभारण्यात येणार
मुंबई दि.२८ :- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या काल्हेर- अघई रस्त्यावरून जाणारी जलवाहिनी ओलांडून पलिकडे जाता यावे यासाठी भिवंडी तालुक्यातील खलिंग खुर्द गावात एक पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे हा पूल बांधण्यात येणार असून पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी ४० लाख रुपये खर्च येणार आहे.
नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस आजपासून मुंबईत २४ केंद्रांवर उपलब्ध
मोडक सागर आणि तानसा धरणांमधून वैतरणा, अपर वैतरणा, मध्य वैतरणा व तानसा धरणांपासून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांलगत सेवा रस्ते बांधण्यात आले आहे. यापैकी एक महत्वाचा रस्ता म्हणजे काल्हेर – अघई रस्ता. या रस्त्यावरून तानसा आणि मोडकसागर धरणांपर्यंत पोहोचता येते. या रस्त्यावरील मौजे खलिंग खुर्द गावातील रहिवाशांना जलवाहिनी ओलांडण्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्यांचा वापर करावा लागतो. या पायऱ्या जुन्या झाल्या असून जलवाहिन्या ओलांडण्यासाठी त्या असुरक्षित आहेत.
कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू
भिवंडी येथील उत्कर्ष सेवा संस्था आणि पुंडास ग्रामपंचायतीने मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे. खलिंग गावातील स्थानिक ग्रामस्थांना स्मशानभूमी आणि शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे मौजे खलिंग खुर्द येथे जलवाहिनी ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.