मुंबई आसपास संक्षिप्त

गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई दि.०३ :- राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ या पुस्तिकेचे बुधवारी मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. राज्य सरकारच्या १०० दिवसांतील वाटचालीचा आढावा यात घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले

 

एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १९३ कोटी रुपयांचा दंड वसूल

मुंबई – एप्रिल ते ऑक्टोबर २२ या कालावधीत विना तिकीट प्रवाशांकडून १९३.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या वर्षी वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेच्या तुलनेत यंदा १०७.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी २९ लाखांहून अधिक प्रवाशांकडून हा दंड वसूल केला.

 

विकासाचा कल्पवृक्ष’ ध्वनी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची माहिती देणा-या ‘विकासाचा कल्पवृक्ष’ ध्वनी पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत झाले.‌ ‘स्टोरी टेल’ ने हे ऑडिओ बुक प्रकाशित केले आहे. याप्रसंगी ‘स्टोरी टेल’चे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रशांत मिरासदार आदी उपस्थित होते. ‘विकासाचा कल्पवृक्ष’ हे पुस्तक किरण कुलकर्णी यांनी लिहीले असून ऑडिओ बुकसाठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.

 

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची दुसरी फेरी जाहीर

मुंबई – वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची दुसरी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली या फेरीमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १ हजार ९०१ तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ४७३ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली या विद्यार्थ्यांना येत्या सहा नोव्हेंबर पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

 

पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडुप येथे शौचालये

मुंबई – पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडुप येथे शौचालय बांधण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेने घेतला आहे या कामांसाठी 86 लाख वीस हजार रुपये खर्च येणार आहे ही शौचालय बांधण्यासाठी पाच जागांची निवड करण्यात आली आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये निर्वाह भत्ता

 

मराठा समाजामधील विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये निर्वाह भत्ता

मुंबई – महाराष्ट्रातील मराठा समाजामधील विद्यार्थ्यांना दरवर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था या अंतर्गत वसतिगृह शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत.‌ या समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे हा भत्ता देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.