मुंबई आसपास संक्षिप्त

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची प्रकट मुलाखत

मुंबई – मराठी नाट्य कलाकार संघातर्फे येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे‌. परळ येथील दामोदर नाट्यगृहात संध्याकाळी सहा वाजता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ज्ञानेश पेंढारकर आणि सहगायक हे सांगितिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 

‘इच्छापत्र का आणि कसे करावे?’ या विषयावर व्याख्यान

डोंबिवली – आम्ही दुर्गा आणि अन्य दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ डिसेंबर रोजी डोंबिवलीत ‘इच्छापत्र का आणि कसे करावे’? तसेच ‘नामनिर्देशन समाज आणि वास्तव’ या विषयावर डॉक्टर शरद माडीवाले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळेत वक्रतुंड सभागृह तिसरा मजला श्री गणेश मंदिर संस्थान फडके रस्ता डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

 

‘म्हाडा’ सोडतीसाठी नवे सॉफ्टवेअर

मुंबई – ‘म्हाडा’कडून जाहीर होणाऱ्या सोडतीसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमुळे इच्छुक अर्जदारांना अर्ज भरण्याच्या वेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागतील. ‘म्हाडा’च्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांना नवीन सॉफ्टवेअरमधील बदल अधिक उपयुक्त ठरतील, असा विश्वास ‘म्हाडा’ने व्यक्त केला आहे.

 

विनातिकीट प्रवाशांकडून ६३ लाखांहून अधिक दंड वसूल

कल्याण – कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण आणि अंबरनाथ तर कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान शहाड रेल्वे स्थानकामधून सर्वात जास्त प्रवासी विनातिकीट प्रवासी

आढळून आले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कल्याण स्थानकात सर्वाधिक २६ हजार ९०७ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ६३ लाख ६९ हजार १४७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.