डोंबिवलीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

डोंबिवली दि.०५ :- रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथांवर अतिक्रमण केल्याने या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असून नागरिकांना चालणेही जिकरीचे झाले आहे. त्यातच फेरीवाल्यांची दादागिरी, मुजोरी, जागा बळकावण्यावरून आपापसात हाणामाऱ्या अशा घटना वाढू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

हेही वाचा :- मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ; पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे आपतकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना

सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फौज दाखल झाली. पालिका मुख्यलयापासून सुरू झालेल्या या कारवाईत दुकानाबाहेर फुटपाथवर केलेले अतिक्रमण, हातगाड्यांवर धडक कारवाई करत तोडण्यात आल्या. कारवाईमुळे स्थानक परिसर काही मिनिटांत फेरीवालामुक्त झाला. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.

हेही वाचा :- कांदिवलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

राजकीय पक्षांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी स्थानक परिसरात कारवाईसाठी पोलिस, पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह पालिका आयुक्त गोविंद बोडके रस्त्यावर उतरले होते. मात्र कारवाई पथक येत असल्याची माहिती आधीच मिळाल्याने फेरीवाल्यांनी पळ काढला. यामुळे काही काळ तरी परिसराने मोकळा श्वास घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.