कल्याण-डोंबिवलीकरांकडून सांगली नगर वाचनालयास पुस्तके प्रदान

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२८ :- सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे यंदाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तथापि यंदाच्या महापूरामध्ये वाचनालयाचे अतोनात नुकसान झाले. जवळपास 40 हजार पुस्तके पुरामध्ये वाहून गेली व अनेक दुर्मिळ ग्रंथांचे नुकसान झाले. कल्याण-डोंबिवलीच्या अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान व आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांच्यावतीने सांगली जिल्हा नगर वाचनालयास कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह आणि इतर विविध विषयांवर 125 पुस्तके प्रदान करण्यात आली.

हेही वाचा :- Dombivali ; पेट्रोल टँकरचा उडाला भडका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मानवी वस्ती बचावली

सांगली नगर वाचनालय व्याख्यानमाला कार्यक्रमाचे औचित्य साधून अक्षर मंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, उपाध्यक्ष जयंत भावे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहेते, पदाधिकारी बाळासाहेब तोरसकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर यांचेकडे ही पुस्तके प्रदान केली. याप्रसंगी उपक्रम समन्वयक जयंत भावे यांनी वाचनालयास आणखी पुस्तके व विश्वकोश खंड लवकरच भेट देणार असल्याचे आश्वासन दिले. अक्षरमंच प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 10 वर्षांमध्ये 400 हून अधिक शाळा, ग्रंथालये, आश्रमशाळा, अनाथालय यांना 30 लक्ष रुपयांची 50 हजारहून अधिक पुस्तके प्रदान करण्यात आली असल्याचे आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहेते यांनी सांगितले.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीतही चालते वेठबिगारी ६ अल्पवयीन कामगारांची सुटका

सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या व्याख्यानमाला द्वितीय पुष्प इस्त्रो येथे अंतराळ वैज्ञानिक म्हणून कार्य करणाऱ्या धनेश बोरा यांनी “चांद्रयान 2 अपयश की यश” या विषयावर सुदंर विवेचन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यान सत्रानंतर अक्षरमंच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी धनेश बोरा यांच्या उपस्थितीत नगर वाचनालयास पुस्तके प्रदान करण्यात आली. सदर उपक्रमासाठी अरुंधती क्षीरसागर, ज्योती वाघीरकर, मुग्धा घाटे, भालचंद्र घाटे, केशवासूत कवी कट्टा यांनी मोलाचे सहकार्य केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email