पी एस कोठारी ज्वेलर्स तर्फे रक्तदान रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद विविध क्षेत्रातुन उपक्रमाचे कौतुक.
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.१७ – समाजहित, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून रक्तदानाचा उपयोग समाजातील गोर गरीब रुग्णांना व्हावा या दृष्टिकोणातुन तसेच पी एस कोठारी ज्वेलर्स या उरण मधील प्रसिद्ध ज्वेलर्स शॉप तर्फे प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून तेरापंथी सभागृह, वाणीआळी,उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन पी एस कोठारी ज्वेलर्स उरण चे मालक सुरेंद्र कोठारी यांच्या हस्ते झाले. यावेळी परेश कोठारी, JNPT विश्वस्त महेश बालदि, नगरसेविका यास्मीन गॅस, उद्योजक श्रीपाल मेहता, राजेश शहा, दिनेश ठक्कर, जसीम गॅस,दिनेश भडाना,किसन गुजर, दिलीपसिंग राव,केईएम हॉस्पिटल ब्लड बँक परेल मुंबईचे समाजविकास अधिकारी प्रकाश सावंत,डॉ. अमिता कोटक आदि मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :- गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सोन्याचे बक्षिसे ठेवण्यात आली होती लकी कूपन द्वारे एकुण तीन नावे निवडण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक केसरीनाथ पाटिल बोरी(बक्षिस 1 तोळे सोने),द्वितीय क्रमांक अमित भोईर भेंडखळ(बक्षिस 5 ग्रँम सोने),तेजस ठाकुर अलीबाग(बक्षिस 2 ग्रँम सोने)यांना ही बक्षिसे लकी कूपन द्वारे प्राप्त झाली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून समजले जाते. पी एस कोठारी ज्वेलर्स तर्फे प्रथम वर्धापन दिना निमित्त राबविलेल्या या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 104 दात्यांनी रक्तदान केले.केईएम हॉस्पिटल ब्लड बँकचे सर्व कर्मचारी वर्गांनीही यासाठी विशेष मेहनत घेतली.कोठारी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.