आमदार खासदारासाठी नाही तर नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या’!

डोंबिवली दि.१९ :- ‘महाराष्ट्रातून जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना मला प्रत्येक जण त्यांच्या मनातील गोष्टी सांगत आहेत. जो शेवटचा आवाज आहे जो माझ्यापर्यंत पोहचत नाही, त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. मला आमदार, खासदार, मंत्री बनायचे नाही, तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी मला आशीर्वाद द्या’, अशी आर्त हाक शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत दिली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रे माध्यमातून साडे पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून डोंबिवलीत दाखल झाले, त्यावेळी त्यांनी उपस्थित डोंबिवलीकरांची संवाद साधला.

नवा महाराष्ट्र घडविणे हा एकट्या दुकट्याच काम नाही

हेही वाचा :- पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

ते म्हणाले माझ्या ‘आईचं गाव डोंबिवली. माझी मावशी, आजीही डोंबिवलीची पण मला प्रचारासाठी सभेत बोलावे लागेल, अस कधीच वाटले नव्हंत. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी जो विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढून त्यांची मने जिंकायची आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे फिरत असताना वंचितांच्या समस्या समजून घेत आहे. सर्वांच्या गोष्टी कळून आल्या आहेत सिंहाची, वाघाची डरकाळी माहित होते. पण शेवटची मंद हाक माहित होत नाही आणि यासाठीच मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. सर्वांनी मला हात वर करून आशीर्वाद द्या.

हेही वाचा :- Air India ; वैमानिक विमान सोडून आला धावपट्टीवर!

मी एकटा नवा महाराष्ट्र घडवू शकत नाही. सर्वांची ताकत हवी आहे. नवा महाराष्ट्र घडविणे हा एकट्या दुकट्याच काम नाही आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे’. डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून शहरप्रमुख राजेश मोरे यांनी चांदीची तलवार भेट दिली. यावेळी महापौर विनिता राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवल, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, आमदार सुभाष भोईर, किशोर मानकामे, राहुल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. रस्त्याची कामे करीत आहोत पण धुवादार पावसामुळे खड्डे पडत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने माध्यमातून काम करू तर येथील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री शहर सडक योजना करून कल्याण डोंबिवलीसाठी निधी आणू. ज्यांच्यावर विश्वास आहेत त्यालाच समस्या अडचणी सांगितल्या जातात.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email