बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजपचा विरोध- ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ५
बृहन्मुंबई महापालिकेने येत्या १६ जूनपासून पाणीपट्टी दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. लीटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित असून भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावित दरवाढीला विरोध केला आहे.
एकीकडे मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत द्यायची आणि दुसरीकडे पाणीपट्टी वाढवायची, असे चालणार नाही. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही पाणीपट्टी वाढ रोखावी , असे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
—–