अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

मुंबई दि.१७ – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मुंबईत केली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे.‌ उद्धव ठाकरे शिवसेनेकडून येथे दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.‌

हेही वाचा :- जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्ष, अर्जुन, किरणला सुवर्णपदक

तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.‌ उद्धव ठाकरे शिवसेना गट विरुद्ध भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गट यांच्यातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.‌ भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :- महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांची विक्री केली जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, असे आवाहन केले होते.‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपने निवडणूक न लढविण्याचे ठरविल्यामुळे निवडणुकीतील चुरस आता संपली आहे. मात्र इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होईल.‌ पण आता ती निव्वळ औपचारिकता ठरणार आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published.