भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास…

(म.विजय)

ठाणे दि.१२ :- पर्यावरण रक्षणासाठी झगडणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. मात्र, आता त्यांनी भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनासह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत; अन्यथा, येत्या 17 डिसेंबर रोजी मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांनी दिला आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच मुंबईतील दादर येथील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमला होता.

हेही वाहा :- मोदी-फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्‍टला दणके बसणार 

मात्र मानवंदना देऊन घरी परतणार्‍या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला केला गेला, दगडफेक करण्यात आली होती. समाजकंटकांनी योजनाबद्धरीतीने अनेक गाड्यांची तोडफोड केली व जाळपोळ केली. या हल्ल्यात अनेक बांधव जखमी झाले होते. या प्रकारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता. या प्रकारचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील दलित समाज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला होता. तत्कालीन सरकारविरोधातील खदखद व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरूणांवर व महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :- Dombivali ; अनधिकृत बाधण्यात आलेल्या इन्फोसिस सिस्टीम प्रा.ली. इमारतीला सील ठोकले

हे गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा; तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव १९४९-५० मध्ये दिला होता. आता मराठा समाजाने त्याच उद्देशाने मोर्चे काढले होते. मराठा समाजाने अत्यंत शांततेत मोर्चे काढलेले असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकप्रकारे या समाजावर तो अन्यायच आहे. त्यामुळे मराठा मोर्चा आंदोलकांवरीलही गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘न्याय संकल्पनेवर’ चालत आहे, हे दाखवून द्यावे, असेही भय्यासाहेब इंदिसे यांनी म्हटले आहे. येत्या १६ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे न घेतल्यास 17 डिसेंबर रोजी मंत्रालयासमोरच दलित- मराठा समाजाकडून एकत्रितपणे निदर्शने करण्यात येतील, असेही इंदिसे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.