असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्नशील
‘भामसं’चे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांचे प्रतिपादन
पुणे, दि. २६
देशातील आणि जगातील संघटित, असंघीटत क्षेत्रातील काम गारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी केले.
‘एल २०’ या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. चर्चासत्राचे उदघाटन मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्सचे (पुणे) अध्यक्ष दीपक करंदीकर यांच्या हस्ते झाले. कामगार उपायुक्त अभय गीते, कामगार कायदे तज्ञ ॲड. अशोक गुप्ते, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता वायंगणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाज सुरळीत चालण्याकरिता कायद्याचा धाक, वचक असणे आवश्यक आहे तरच समाजाची प्रगती होवून विकसनशीलतेकडून विकासाकडे जाता येईल, असे ॲड. गुप्ते यांनी सांगितले. कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स आग्रही असल्याचे
करंदीकर म्हणाले.
विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी यांचीही भाषणे झाली. ससूत्रसंचालन भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
—–