भारतीय जनता पार्टी खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर.

भारतीय जनता पार्टी खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर.

 

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )भारतीय जनता पार्टी चे कट्टर कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची भारतीय जनता पार्टीच्या खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसे अधिकृत नियुक्तीपत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी नवनाथ ठाकूर यांना उरण शहरातील आमदार कार्यालयात दिले.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर,आ. महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवी शेठ भोईर,उपाध्यक्ष मुकुंद गावंड, युवा नेते महेश कडू,पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, नगरसेवक कौशिक शहा,सरपंच विशाखा ठाकूर,प्रदीप ठाकूर, बंटी म्हात्रे,प्रशांत ठाकूर,जितेंद्र ठाकूर, हेमंत म्हात्रे,प्रीतम ठाकूर, सुरज म्हात्रे,निलेश पाटील,अच्युत ठाकूर, सागर ठाकुर,उत्कर्ष ठाकुर,निलेश म्हात्रे,लखन ठाकूर, रुपेश म्हस्कर, साईल म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने आपली भारतीय जनता पार्टी उरण तालुका खोपटे गाव अध्यक्षपदी नियुक्ती करताना आनंद होत आहे या नियुक्तीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन असे शुभेच्छा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी दिले.तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता माननीय देवेंद्र फडणवीस तसेच आपले नेते माननीय रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपचे ध्येय धोरण व कार्यक्रम यशस्वीरित्या अंमलबजावणी कराल याची मला खात्री आहे. आपल्या सोबत आपल्या विभागातील पार्टीचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्व नेते व कार्यालय यांच्याशी नियमितपणे व सातत्याने संवाद साधून पक्षाची प्रतिमा उज्वल कराल अशी अपेक्षा करतो असे सांगत आमदार महेश बालदी यांनी खोपटे गावचे नवनिर्वाचित गाव अध्यक्ष नवनाथ नारायण ठाकूर यांचे अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी खोपटे गाव अध्यक्ष पदी नवनाथ ठाकूर यांची निवड झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवनाथ ठाकूर यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.