बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ५ ऑक्टोबरपासून बंद
मुंबई दि.०५ :- मुंबई दर्शन घडविणारी डबल डेकर ओपन डेक बस येत्या ५ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. २६ जानेवारी १९९७ या दिवशी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि बेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही बस सेवा सुरु करण्यात आली होती.
अंधेरी येथील नव्या जलतरण तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार – मंगल प्रभात लोढा
सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचे आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढण्यात आलेली निविदा रद्द झाली आहे. दर महिन्यात सुमारे २० हजार पर्यटक या बससेवेचा लाभ घेत होते.