बेलापूर- मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून सुरु

मुंबई दि.२५  :- जलवाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे उद्यापासून (२६ नोव्हेंबर) बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवारी ही वॉटर टॅक्सी धावणार असून एका दिवसात वॉटर टॅक्सीच्या केवळ दोन फेऱ्या होणार आहेत.

बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता वॉटर टॅक्सी सुटणार ती सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचणार आहे. तर संध्याकाळी ६ वाजता मांडव्याहून निघणारी वॉटर टॅक्सी रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.