बदलापूर बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवली बारवी धरण हाऊसफुल

ठाणे दि.१७ :-  गेल्या काही दिवसांपासून ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर यासारख्या मुख्य शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतीना पाणी पुरवठा केला जातो.

हेही वाचा :- शेतकरी पुन्हा एकदा संकटात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची ४ मीटरने वाढवण्यात आली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्याच वर्षी बारावी धरण नवीन क्षमतेनुसार १०० टक्के भरले आहे. बारवी धरणाची पूर्वीची क्षमता ही 68.60 मीटर होती. त्यानंतर नुकतंच या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आली असून ती 72.60 मीटरपर्यंत करण्यात आली आहे.

हेही वाचा :- न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी पंतप्रधानांच्या भेटीला

त्यामुळे यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणी साठा जमा होणार आहे. तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमता 234  दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ही क्षमता वाढून 340.48 दशलक्ष घनमीटर इतकी होणार आहे.

देवेंद्रू तू दयाळू, पक्षप्रवेश दाता. केले घोटाळे मी, अभय दे आता.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email