बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी

मुंबई दि.२० :- बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येत्या १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हँड ग्लायडर, हॉट एअर बलून यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, सामान्य जनता, अती महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.