‘पीएफआय’वर बंदी हा अंतर्गत दहशतवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

.

‘पीएफआय’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे. मुसलमान युवकांचा बुद्धिभेद करून ‘पीएफआय’ने देशभरात हिंदू युवतींचे अपहरण करून ‘लव्ह जिहाद’, हिंदू नेत्यांच्या हत्या, हिंदूविरोधी दंगली आदींचे षड्यंत्र रचत अनेक आतंकवादी कृत्ये केली.

वर्ष 2047 मध्ये भारताला ‘इस्लामिक स्टेट’ करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी देशहिताच्या ‘सीएए’, ‘एनआरसी’ या कायद्यांना हिंसक पद्धतीने विरोध केला. एकूणच भारताचे इस्लामीकरण करण्याचे ध्येय बाळगणार्‍या या आतंकवादी चळवळीला आज प्रतिबंध बसला आहे, असे म्हणता येईल.

वर्ष २०१६ मध्ये २९ सप्टेंबर यादिवशी मा. मोदींनी देशाबाहेरील आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, आज बरोबर सहा वर्षांनी देशांतर्गत आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली आहे. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करणार्‍या मोदी सरकारच्या धाडसी निर्णयाचे सनातन संस्था स्वागत करते, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.