लॉकडाऊनच्या काळात ‘बालसंस्कार सत्संग’, आणि हिंदु धर्माची महानता सांगणारी ‘धर्मसंवाद’ मालिका !

 

ठाणे – दळणवळण बंदीच्या काळात घरात बसून अनेकांना तणाव, निराशा आदी मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. लोकांनी बाहेर पडू नये म्हणून शासनानेही दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका चालू केल्या आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहनोपचारतज्ञ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ‘तणावमुक्ती तथा आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर अनेक वर्षे सखोल संशोधन आणि अभ्यास केलेला आहे.

त्या संशोधनावर आधारित विषय घेऊन सनातन संस्थेच्या वतीने ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबुक’ या सोशल मीडियावर मुलांसाठी ‘बालसंस्कार’ व अन्यांसाठी ‘धर्मसंवाद’ नावाची हिंदी भाषेतील ऑनलाईन सत्संग मालिका चालू करण्यात आली आहे.

या मालिकांचे आतापर्यंत 50 हून अधिक भाग प्रसारित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

बालसंस्कार मालिकेचे 3 भाग पाहिल्यावरच मुलांमध्ये सकारात्मक बदल झाले असल्याचे अनेक पालकांनी कळवले आहे.

तरी दळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊन’च्या) काळात घरी बसून या ‘ऑनलाईन सत्संग मालिकां’चा लाभ घ्यावा आणि आपले जीवन आनंदी बनवावे, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

बालसंस्कार मालिकेतील ‘ईश्‍वरसमान माता-पित्याच्या सेवेचे महत्त्व !’, ‘प्रतिदिन छोट्या छोट्या कृतीतून संस्कारी बना !’, ‘विदेशी नाही, भारतीय खेळ खेळून देशाभिमान वाढवावा !’, ‘हैरी पॉटर, टारजनसारख्या काल्पनिक नव्हे, सुसंस्कारी आणि आदर्श पुस्तके वाचा !’, ‘आपल्या मातृभाषेचा स्वाभिमान बाळगा !’, ‘स्वच्छता राखा, आपले आचरण आदर्श बनवा !’, ‘नैतिकता वाढवा, नेहमी सत्य बोलावे !’ आदी विषयांमुळे मुलांवर चांगले संस्कार होऊन ते उद्याचे आदर्श आणि सदाचारी नागरिक होऊ शकतात.

‘धर्मसंवाद’ मालिकेद्वारे हिंदु धर्माविषयीचे समाजात पसरलेले अनेक अपसमज दूर करून धर्माची महती सांगणारे विषय, उदाहरणार्थ ‘वैश्‍विक संकटे का येतात ?’,

‘कोरोनासारख्या महामारीत तणावमुक्तीसाठी काय करावे ?’, ‘दैनंदिन जीवनात येणार्‍या विविध समस्यांच्या निवारणार्थ काय करावे ?’, तसेच ‘प्रभु श्रीराम खरेच मांसाहारी होते का ?’, ‘भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवण्यामध्ये अध्यात्माची भूमिका !’ इत्यादींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अशा अनेक विषयांची उत्तरे देऊन त्याची चर्चा या मालिकांमध्ये करण्यात आलेली आहे.

हिंदी भाषेत असणार्‍या या ‘ऑनलाईन सत्संगांच्या मालिकां’तर्गत नामजप सत्संग सकाळी 10.30 ते 11.15, तर पुनर्प्रक्षेपण दुपारी 4 ते 4.45; ‘बालसंस्कारवर्ग’ सकाळी 11.15 ते 12, ‘भावसत्संग’ दुपारी 2.30 ते 3.15 आणि ‘धर्मसंवाद’ रात्री 8.00 ते 8.45 आणि त्याचे पुनर्प्रक्षेपण दुसर्‍या दिवशी दुपारी 1 ते 1.45 या वेळेत असते.

‘ऑनलाईन सत्संग मालिका’ आणि Facebook.com/Sanatan.org येथे थेट प्रक्षेपणाद्वारे पहाता येऊ शकेल.
वरील ऑनलाईन सत्संगमालिका नंतरही ‘यू ट्यूब’वर पहाता येऊ शकतात.

* ‘बालसंस्कार’ मालिकेची मार्गिका : bit.ly/353XY9i
* ‘धर्मसंवाद‘ मालिकेची मर्गिका : bit.ly/3aKwkQ0 (यातील काही ‘लेटर्स’ कॅपिटल आहेत.)

आपला नम्र,

श्री. हरी प्रभू
‘सनातन संस्थे’करिता
संपर्क : 9821576982

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email