‘भाजप’कडून सापत्न वागणूक – खासदार गजानन किर्तीकर

मुंबई दि.२६ :- भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला (शिवसेनेला) सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा खासदार गजानन किर्तीकर यांनी केला. आम्ही १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी मॉरिशसमध्ये अनावरण

यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. पण आता एनडीएचा भाग असल्याने आमची कामे झाली पाहिजेत, आम्हाला घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, असेही किर्तीकर यांनी सांगितले.

दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ परिसरात एक दिवस पाणीपुरवठा बंद

लोकसभेसाठी २२ जागा शिवसेनेच्याच आहेतच. २०१९ साली भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, असेही किर्तीकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.