‘बालभवन’चे उपक्रम आता संपूर्ण राज्यभरात

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१५ :- ‘बालभवन’चे उपक्रम येत्या वर्षापासून संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात येतील. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली.

दादर, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईने आयोजित केलेल्या विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी केसरकर बोलत होते.
व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांतही सहभाग घ्यावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले. बालभवनचे संचालक नाईकवाडी यांनी ‘बालभवन’तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, बृहन्मुंबई महपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.