‘आयुष’ मंत्र्यांच्या हस्ते उद्या राष्ट्रीय युनानी औषध संस्थेची पायाभरणी
नवी दिल्ली, दि.२८ – केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येसू नाईक यांच्या हस्ते उद्या गाझियाबाद इथे राष्ट्रीय युनानी औषध संस्थेची पायाभरणी करण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यावेळी उपस्थित राहतील.
हेही वाचा :- अभाविप कल्याण शाखा तर्फे विजयोउत्सव साजरा!
ही संस्था 10 एकर भागात विकसित करण्यात येणार असून, यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर 200 खाटांचे रुग्णालय कार्यरत होईल, हे रुग्णालय युनानी औषधीचे उत्तर भारतातील सर्वाधिक मोठे रुग्णालय असेल. तसेच या संस्थेत दर्जेदार संशोधन आणि शिक्षणाचीही सोय असेल.
Please follow and like us: