नोकरीवरून काढून टाकलेल्या व्यक्तींकडून दाऊदच्या हस्तकांच्या नावाने ध्वनिमुद्रित संदेश

पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला असण्याची माहिती

मुंबई दि.२२ :- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारा ध्वनिमुद्रित संदेश अज्ञात व्यक्तींकडून वाहतूक पोलिसांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. या धक्कादायक संदेशानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली.

मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात २० नोव्हेंबर रोजी सात आणि २१ तारखेला पुन्हा १२ ध्वनिमुद्रित संदेश मिळाले. पोलीस तपासात ही चौकशी पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने तयार करणा-या आणि नंतर मानसिक आजारामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या एका व्यक्तीपर्यंत येऊन पोहोचली.
दरम्यान या व्यक्तिविरोधातर कोणती कारवाई झाली की, नाही? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.