सरकारी प्रतिभूतींच्या विक्रीसाठी लिलाव
नवी दिल्ली, दि.०९ – केंद्र सरकारने पुढील विक्रीची घोषणा केली आहे.
1.मूल्याधारित लिलावाच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी 7.37 टक्के सरकारी प्रतिभूती, 2023
2.मूल्याधारित लिलावाच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी 7.17 टक्के सरकारी प्रतिभूती, 2028
3.मूल्याधारित लिलावाच्या माध्यमातून 2000 कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी 7.40 टक्के सरकारी प्रतिभूती, 2035
4.मूल्याधारित लिलावाच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी 7.06 टक्के सरकारी प्रतिभूती, 2046
एकूण अधिसूचित 11000 कोटी रुपयांची मर्यादा लक्षात घेऊन सरकारकडे अतिरिक्त प्रत्येकी 1000 कोटी रुपये मूल्याचे हक्क (सबस्क्रिप्शन) स्वत:कडे ठेवण्याचा पर्याय असेल. मल्टिपल प्राईजचा वापर करून हे लिलाव केले जाणार आहेत. मुंबईतल्या फोर्ट येथील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात शुक्रवार दि. 12 ऑक्टोबर 2018 रोजी हे लिलाव होतील. सरकारी रोख्यांच्या लिलावात बिगर स्पर्धात्मक निविदांच्या योजनेनुसार पात्र व्यक्ती आणि संस्थांना प्रतिभूतींच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5 टक्के वितरित केले जातील. लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक बोली इलेक्ट्रॉनिक स्वरुपात 12 ऑक्टोबर रोजी ई कुबेर प्रणालीवर पाठवता येतील.
लिलावाचे निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर केले जातील आणि यशस्वी बोलीदाराला 15 ऑक्टोबर रोजी पैसे भरता येतील.