ऊर्जामंत्री यांच्या आश्वासन पुर्ती कडे विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे लक्ष

ऊर्जामंत्री यांच्या आश्वासन पुर्ती कडे विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे लक्ष

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ

सतत 2 वर्षे विविध पत्रव्यवहार, निदर्शने, आंदोलने केल्या नंतर अखेर 21 मार्च 2022 रोजी विधानसभेवर मोर्चा काढण्यावर राज्यातील वीज कंत्राटी कामगार ठाम राहिल्यावर ऊर्जामंत्री  नितीन राऊत व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सर्व समस्या समजावून घेऊन लवकरच प्रशासन व संघटना अशी सविस्तर बैठक घेतली जाईल व सर्व समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकारी यांना राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना 21 मार्च रोजी दिले होते.

नुकतेच एसटी महामंडळाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले ही घटना जरी दुर्दैवी असली तरी केवळ दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्यामुळेच या शोषित पीडित कामगारांच्या संयमाचा बांध फुटला हे सत्य आहे.

वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे दर महिन्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे व कुंपणच शेत खात असून तक्रारींची दखल प्रशासन घेत नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे असे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले आहे.

वीज कंपनीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार थांबवून या कामगारांना कंत्राटदार मुक्त व वयाच्या 60।वर्षा पर्यंत रोजगाराची हमी इत्यादी दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ 2015 पासून करत आहे. मंत्री महोदयांच्या सकारात्मक चर्चेमुळे या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल अशी आशा संघटनेला आहे ,

कंत्राटदारांच्या जाचातून या कामगारांना मुक्त करावे व कंपनीचा देखील आर्थिक फायदा करावा असे साकडे संघटनेने ऊर्जामंत्र्याना घातले आहे. या बाबतीत शासनाने दखल घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.