क्रीडाशास्त्राचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनी क्रीडा कुलात खेळाडू घडविले जातात – मनोज देवळेकर

चित्तथरारक क्रीडा प्रात्यक्षिकांनी डोंबिवलीकर अचंबित

डोंबिवली दि.१७ :- गेल्या २५ वर्षात निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी क्रीडा कुलाने ३५० राष्ट्रीय खेळाडू तयार केले असून क्रीडाशास्त्राचा अभ्यास करून इथे खेळाडू घडविले जातात, असे प्रतिपादन क्रीडाकुलचे प्रणेते आणि प्रमुख मनोज देवळेकर यांनी येथे केले. ज्ञान प्रबोधिनीच्या डोंबिवली केंद्रातर्फे १४ ते १६ एप्रिल या कालावधीत सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करावे हे प्रशासनाला कळले नाही का? राज ठाकरे यांंचा सरकारला सवाल

शिबिराची सांगता निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुलाच्या पन्नास विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सादर केलेल्या क्रीडा प्रात्यक्षिकांनी झाली. क्रीडाकुलाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गुरुकुल टिळक नगर शाळेच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमात देवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  स्पर्धा म्हणजे इतरांच्या डोक्यावर पाय द्या आणि वर जा असा समज असतो, मात्र क्रीडाकुल मुलांना स्पर्धा म्हणजे सहकार्य आहे हे शिकविते.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण शाश्वत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

क्रीडाकुल फक्त विद्यार्थीच नाही तर समाजाच्या स्वास्थ्यासाठीही काम करत असल्याचे देवळेकर यांनी सांगितले. क्रीडाकुलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, अधांतरी मल्लखांब तसेच जिम्नास्टिक या क्रीडा प्रकारांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. बाटल्यांवर ठेवलेल्या स्टूलांवर सुट्या मलखांबांवर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित डोंबिवलीकर अचंबित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.