एकाच वेळी चार मुलांना जन्म, मातेसह चारही बाळे सुखरुप
शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आज दुपारच्या सुमारास घडली. गुलशन अन्सारी असे या महिलेचे नाव असून मातेसह चारही बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टर थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे सातव्या महिन्यात चार बाळांना जन्म देण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे समजते आहे.
चार बाळांना जन्म देणारी गुलशन ही पती व पाच वर्षाच्या मुलीसह भिवंडी शहरातील पिराणी पाडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. तिचा पती हकिक अन्सारी हा वाहनचालक आहे. गरोदर राहिल्यानंतर २ महिन्यापूर्वी तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी चार मुले होणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर तिच्यावर मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. तेथील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी २ ऑक्टोबर तारीख दिली होती. मात्र त्या आधीच प्रसूतिवेदना झाल्याने तिला घरच्यांनी आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.
दुपारी बारा वाजून ५० मिनटांनी तिची पहिली प्रसुती होवून तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत तीन मुलांना जन्म दिला. डॉक्टरांनी या मातेची नार्मल प्रसुती केली असून सध्या चार बाळ आणि मातेसह चारही बाळांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका मातेने चार बालकांना जन्म दिल्याने भिवंडी शहरात हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. डॉ. मीनाक्षी शेगावकर यांनी सुखरूपपणे गुलशन यांची प्रसुती केली. चारही बाळे डॉ. पिरजादे यांच्या देखरेखीखाली ठणठणीत असल्याने गुलशनच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानल
Sources – ABI News