आयआययूएस अंतर्गत सहाय्य

नवी दिल्ली, दि.२७ – औद्येागिक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेंतर्गत (आयआययूएस)/सुधारित औद्योगिक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेंतर्गत (एमआयआययूएस) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने मंजूर केलेले 58 प्रकल्प सध्या विविध राज्यात आहेत. त्यांना विभागाकडून निधी वितरित केला जातो. 2015-16 या वर्षात 124 कोटी, 2016-17 या वर्षात 129.50 कोटी तर 2017-18 या वर्षात 74.90 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला.

हेही वाचा :- राष्ट्रीय बौद्धीक संपदा हक्क धोरण

महाराष्ट्रातल्या औरंगाबाद येथील मराठवाडा ऑटोमोबाईल क्लस्टरला 2016-17 या वर्षात 3 कोटी 46 लाख रुपयांचा तर 2017-18 या वर्षात 1 कोटी 74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. कोल्हापूर फाउंड्री क्लस्टरला 2016-17 या वर्षात 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर नाशिक अभियांत्रिकी संकुलाला 2015-16 या वर्षात 29 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email