पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

मुंबई दि.११ :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकला अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लोकांना उभा करणं, त्यांची घरं उभारणं हे महत्त्वाच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलून पुढच्या वर्षी घ्या, अशी मागणी राज यांनी केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “दोन दिवसांनी पाणी ओसरेल, रोगराई पसरेल. परिस्थिती स्थिरस्थावर व्हायला अजून वेळ लागेल. दोन-चार दिवसात होणार नाही.

हेही वाचा :- साथीचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात असंतोषाचा स्फोट होणार ?

सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लावणार, मग मदतीसाठी सरकार हात वर करणार. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे असं मला वाटतं. त्या पुढील वर्षी घ्या. संपूर्ण लक्ष कोल्हापूर, सांगलीसह आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. आपल्याकडे एका पुतळ्यावर तीन हजार कोटी खर्च होतात, लोकांना वाचवण्यासाठी मदत होत नाही, तर काय उपयोग? आज राज्यात एवढा विरोधाभास आहे की, अनेक ठिकाणी पाऊस नाही आणि दुसरीकडे पाऊस आहे तर पूर आला आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घ्यायच्या हे योग्य नाही, माणुसकीला धरुन नाही. त्यामुळे सरकारने निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत आवश्यत आहे. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करावा.”

Bhang भांग जहर नही अमृत है,लेकिन सोनिया गाँधी के इशारे पर भारत में पाबंदी लगी.

Leave a Reply

Your email address will not be published.