ठाकरे विरुद्धात ठाकरे लढणार नाही?

मुंबई दि.०२ :- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. वरळीत उमेदवार दिलेला नाही. युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात आहे.

हेही वाचा :- आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?

अशावेळी आदित्य ठाकरेंचे काका मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना मदत करु शकतात. आदित्य ठाकरे निवडणूक लढत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरळीतून मनसेने उमेदवार दिला तर मराठी मतांची विभागणी होऊ शकते. याचा फटका आदित्य ठाकरेंना बसू शकतो.

हेही वाचा :- कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही

राज ठाकरे कार्यकर्त्यांशी चर्चा करुन वरळीत उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल की आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार की नाही. आजपर्यंत शिवसेना आणि शिवसैनिकांनी सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केलं. याच समाजकारणासाठी मी निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात केली होती.

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही… सगळ्यात मोठा विनोद

Leave a Reply

Your email address will not be published.