डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

मुंबई आसपास प्रतिनिधी
डोंबिवली- डोंबिवलीतील नागरी समस्यांसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले जाणार आहे.‌ त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र/ई मेल पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

डोंबिवली शहर अनेक समस्यांचे माहेरघर झाले आहे.‌ या शहराला कोणीही वाली उरला नसून
महापालिका प्रशासन असो किंवा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असोत त्यांच्याकडून नागरिकांची कायम फसवणूकच झाली आहे.

जय जय महाराष्ट्र माझा’ला आता राज्य गीताचा दर्जा

डोंबिवलीतील नागरिकांनी सहनशीलतेची परिसीमा ओलांडली आहे. त्यामुळे इथे कोणी आवाज उठवत नाही. महापालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी नेमके हेच हेरले.

येत्या २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

डोंबिवलीच्या एमआयडीसी विभागातील नागरिकांनी आणि ‘दक्ष नागरिक मंच या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी आता थेट पंतप्रधान मोदी यांना साकडे घातले आहे‌. पंतप्रधान मोदी यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत तसेच ई मेलही करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील जास्तीत जास्त नागरिकांनी पंतप्रधानांना पत्र पाठवावे किंवा ई मेल करावा, असे आवाहन समाज माध्यमांतून करण्यात आले आहे.‌

डोंबिवलीतील रस्ते, विजेचा लपंडाव, स्वच्छतेचा अभाव, तुंबलेली गटारे, कारखान्यांचे प्रदूषण, सार्वजनिक वाहतुकीचाचा खेळखंडोबा, बेशिस्त रिक्षाचालक, मीटरनुसार भाडे न आकारणे, मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे येथे जाण्यासाठी लागणारा अनेक तासांचा कंटाळवाणा-थकवणारा प्रवास, पाणी आदी नागरी समस्यांचा यात उल्लेख करावा, असे या आवाहनात म्हटले आहे.‌

टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाचे शुक्रवारी उदघाटन

लेखी/छापील पत्र पाठविण्याचा पत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी,
पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, रायसिना हिल, नवी दिल्ली- ११००११
फॅक्स क्रमांक +91-11-23019545,23016857
ई मेल
narendramodi1234@gmail..com किंवा PMO Office:
connect@mygov.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published.