आसपास मुंबई संक्षिप्त

काळ्या- पिवळ्या टॅक्सीला सीट बेल्ट सक्ती नको

सीटबेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या-पिवळ्या टॅक्सीशी तुलना करु नये. यामध्ये अडचणी असून त्याची अंमलबजावणी शक्य नाही. मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्टची सक्ती आणि केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू करू नये, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे.

तीन दिवसांत रेल्वे मार्गावर ३७ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई- ऐन दिवाळीच्या तीन दिवसांत ३७ प्रवाशांना प्राण गमवावा लागला. लक्ष्मीपूजन,नरक चतुर्दशी आणि मंगळवारी तसेच बुधवारी दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या दिवशी हे मृत्यू झाले.‌ दिवाळीच्या दिवसात रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून प्रवासी पडल्यने अपघात झाले .…
करोना संसर्गात वाढ, २४ तासात २ हजारांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली- देशातील कोरोना संसर्गात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली असून गेल्या २४ तासात २ हजार २०८ नवीन रुग्ण आढळले आहेत. १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.‌ देशातील करोनामृतांची एकूण संख्या ५ लाख २८ हजार ९८७ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील करोना-१९ रुग्णांची एकूण संख्या नवीन १ हजार ११२ रुग्णांसह ४ कोटी ४६ लाख ४६ हजार ८८० वर पोहोचली आहे. यातील ४ कोटी ४० लाख ६८ हजार ५५७ रुग्णांनी करोना संसर्गावर मात केली आहे. सध्या देशात २० हजार ८२१ रुग्ण करोना उपचाराधीन आहेत. आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published.