कल्याण स्टेशन परिसरात रिक्षाचालकाची मनमानी; प्रवासी आणि रिक्षाचालकात वाद

कल्याण दि.१८ :- स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानीचे अनेक प्रकार घडले असताना आज आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. रिक्षासाठी रांगेत उभे राहून वाट पाहणाऱ्या प्रवाशांऐवजी दुसऱ्याच प्रवाशांना रिक्षात बसवण्यावरून संतप्त प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसराबाहेर काही प्रवासी रांगेत लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षेची वाट पहात उभे होते.

हेही वाचा :- मनसेच्या सतर्कतेने शहिदांच्या नावाने असलेल्या वास्तूमधील अवैध दारूसाठा जप्त

त्यावेळी आमच्या समोरून 10 ते 12 रिक्षा मागूनच भरून आल्या. त्यामूळे अशीच आणखी एक भरून आलेली रिक्षा आम्हाला नाईलाजस्तव थांबवावी लागल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि प्रवासी चिन्मयी पाटील यांनी सांगितले. आम्ही इकडे रांगेत उभे असतानाही तुम्ही मागून प्रवासी कसे काय भरून आणता? असा जाब या प्रवाशांनी रिक्षाचालकाला विचारला. त्यावर संबंधित रिक्षाचालकाने आमच्यातील एका प्रवाशाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत कोणाला तक्रार करायची आहे.

हेही वाचा :- दुसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाबरोबरच तिसऱ्या पुलाचेही काम होणार सुरु

त्यांना तक्रार करा असेही तो रिक्षाचालक बोलल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना उपस्थित काही रिक्षाचालकांनी आमची बाजू घेत इकडे रांगेत प्रवासी उभे असतानाही तू का मागून प्रवासी भरून आणतोस असा सवाल केला. या घटनेनंतर कल्याण स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email