धर्मांतरबंदी कायदा महाराष्ट्रातही लागू करावा ! संतांच्या उपस्थितीत उल्हासनगर येथे धर्मांतराच्या विरोधात धडक मोर्चा

विविध प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याच्या ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत, तर कोट्याधीश ते गरीब कुटुंबातील असाहाय्य आणि त्रस्तपणाचा गैरफायदा घेऊन ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी आतापर्यंत येथील 1 लाखाहून अधिक सिंधी आणि अन्य समाजातील हिंदूंचे धर्मांतर केले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या धर्मांतराच्या भस्मासूराविरुद्ध एकत्र येऊन ख्रिश्‍चन मिशनर्‍यांना रोखण्याचा एकमुखी निर्धार करत 14 जानेवारीला हा मोर्च्या काढण्यात आला. सिंधी समाज, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यामध्ये पू. साई परमानंदजी, पू. साई लिलारामजी, पू. टोनी साई, पू. टिल्लू सिंगजी यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला, तर  पू. साई परमानंदजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोर्च्याला प्रारंभ झाला. मोर्च्यात सहभागी झालेले संत, विविध संघटनाचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि हिंदू धर्माभिमानी यांनी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी एकमुखी मागणी केली. येथील 1 भागातील 24 सी. स्कूल येथून या मोर्च्याला प्रारंभ झाला. हा मोर्चा पुढे गोल मैदान, नेहरू चौक तसेच शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत गोल मैदान येथे मोर्च्याची सांगता करण्यात आली.

या मोर्च्यात पू. साई परमानंदजी, साई वसनशाह दरबार, पू. साई लिलारामजी, झुलेलाल मंदिर, पू. टोनी साई, गुरु गुलराज कुटीया, पू. टिल्लू सिंगजी, थार्यासिंग दरबार आदी संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे नगरसेवक मनोज लासी, शिवसेनेचे नगरसेवक दिलीप गायकवाड, ह.भ.प. रामदास चौधरी,.ढालु नाथानी, गजानन शेळके,  मनोज साधवानी,.चंदन त्रिलोकानी, अधिवक्ता राहुल चतुर्वेदी, प्रकाश तलरेजा, कमलेश ताराचंदानी, श्री. निखिल गोळे, श्रीमती सिंधू शर्मा यांची उपस्थिती लाभली. या मोर्च्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, साई पक्ष, हिंदू राष्ट्र्र सेना, भाऊ परशुराम झुलेलाल मंडळी संत श्री आसारामजी संप्रदाय राष्ट्रीय छावा संघटना, जय झुलेलाल सोशल ग्रुप, सिंधू युवा संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सिंधी कोन्सिल ऑफ इंडिया, जय झुलेलाल संघर्ष सेवा समिती, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट अजय संभूस, सागर चोपदार, अरुण कुलकर्णी आणि सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सिंधी समाजावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी एकत्र येण्याची आज आवश्यकता ! –  प.पू. टिल्लू सिंगजी, थार्यासिंग दरबार

सिंधी समाजाने ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दिलेली आमिषे- प्रलोभने यांना बळी न पडता हिंदु धर्म टिकवण्यासाठी धर्मशिक्षण घ्यावे. आपल्यातील भेद बाजूला सारून सिंधी समाजावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी एकत्र येण्याची आज आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

उल्हासनगर शहरात अनधिकृत चर्च आणि प्राथनस्थळे पुष्कळ प्रमाणात वाढत आहेत. त्यांच्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनर्‍या मोठ्या प्रमाणावर करत असलेले धर्मांतराचे काम प्रशासनाला दिसत नाही का ? सिंधी समाजातील अनुमाने 1 लक्षहून अधिक हिंदूचे धर्मांतर झाल्याचे कळले आहे. ‘होली वॉटर ’ च्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. आज देशात 40 सहस्त्र मिशनरी पूर्णवेळ याच कामात आहेत. धर्मांतर हे मोठे संकट आहे. यासाठी महाराष्ट्रात धर्मांतरणबंदी कायदा त्वरित लागू करावा, ही आमची मागणी आहे.

सर्जिकल स्ट्राइक करून हिंदु धर्मावरील हे धर्मातरांचे संकट दूर करावे लागेल ! –  मनोज लासी, नगरसेवक, भाजप

आपल्या देशातील 6 राज्यांत धर्मांतरबंदी कायदा लागू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असाच कायदा त्वरित लागू करावा, ही समस्त सिंधी समाजाची मागणी आहे. ज्याप्रमाणे ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून देशावर आलेले संकट दूर करण्यात आले, त्याचप्रमाणे हिंदु धर्मावर आलेले हे धर्मातरांचे संकट दूर करावे लागेल. त्यासाठी आमची सिद्धता आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना या फेरीत सहभागी झाल्या आहेत. ख्रिस्ती मिशनर्‍यांचा कुटील डाव आम्ही हाणून पडल्याविना आता थांबणार नाही. हिंदु जनजागृती समितीने सर्व संघटना एकत्र आणत धर्मांतरच्या विरोधात उभारलेल्या या चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन स्वत:चे धर्मकर्तव्य बजावावे.

मोर्च्यात करण्यात आलेल्या मागण्या :

  1. महाराष्ट्रामध्ये धर्मांतरबंदी कायदा लागू करावा.
  2. उल्हासनगरमध्ये होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी.
  3. धर्मांतरासाठी विदेशातून येणार्‍या पैशांची चौकशी व्हावी.

4. विठ्ठलवाडी येथे चर्चमध्ये झालेल्या बलात्काराची चौकशी व्हावी.

  1. उल्हासनगरमधील अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि प्रार्थना सभांवर कारवाई व्हावी.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email