मोबाईल तपासण्यास मागितला भडकलेल्या पत्नीने घेतला पतीला चावा पतीची पोलिस ठाण्यात धाव

कल्याण दि.३० :- पती-पत्नीचे भांडण कोणत्याही थराला जाऊ शकते, याचा एक विचित्र नमूना समोर आला आहे. मोबाईल तपासण्यासाठी मागितल्यावर संतप्त पत्नीने पतीचा कडाडून चावा घेतल्याची विचित्र घटना कल्याणमध्ये घडली आहे. जखमी पतीने आपल्या चावऱ्या पत्नीच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. कल्याण पश्चिमेकडे खंडागळे सदन येथे दिलीप रेहनकर आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी सकाळी दिलीप यांच्या पत्नी नूतन या मोबाईल घेऊन बाथरूममध्ये गेल्या. बाहेर आल्यानंतर दिलीप यांनी नूतन यांच्याकडे मोबाईल मागितला.

हेही वाचा :- Kalyan ; शॉट सर्किट मुळे लागली आग जीव वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन उडी

मात्र नूतनने मोबाईल देण्यास नकार दिल्याने दिलीप यांनी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मात्र नूतनने मोबाईल हिसकावून घराबाहेर जाऊन त्यांना शिवीगाळ केली. मात्र तरीही दिलीप यांनी नूतन यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता नूतन यांनी दिलीप यांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यामुळे दिलीप जखमी झाले. या प्रकरणी दिलीप यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नी नूतन विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email