Andheri East By-Election: राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका ?

मुंबई दि.१६ :- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या मुंबईतील राजकीय आखाडा तापला आहे. ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी अर्ज भरले. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने ही निवडणूक लढवू नये, तसेच ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केलं होतं.

हेही वाचा :- सावधान ! मुंबईत डोळ्यांची साथ 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यस्थाची भूमिका घेत ‘भाजपने ही निवडणूक लढवू नये’ अशी विनंती भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे ‘रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.