…आणि मुलायमसिंह यांनी मुंबईला धाव घेतली – बच्चन परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत मुलायमसिंह यादव यांचे आणि बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन व परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध होते.‌ हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक/कवी हरिवंशराय बच्चन (अमिताभ यांचे वडील) यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी सर्व कामे सोडून तातडीने मुंबईला धाव घेतली होती.‌

काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही – राज ठाकरे यांच्या ‘ट्विट’मुळे विविध तर्क- वितर्क

१९९३ मध्ये मुलायमसिंह यादव दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.‌ मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुढील वर्षी १९९४ मध्ये त्यांनी ‘यश भारती सन्मान’ सोहळा सुरू केला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये
हरिवंशराय बच्चन यांनाही समावेश होता.

लखनौ येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.‌ मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे हरिवंशराय बच्चन कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते.

तो मी नव्हेच’ ला साठ वर्षे पूर्ण – रवींद्र नाट्य मंदिरात आज विशेष कार्यक्रम

ही बाब मुलायमसिंह यादव यांना कळल्यानंतर त्यांनी सर्व कामे सोडून तातडीने मुंबईला धाव घेतली. बच्चन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बच्चन कुटुंबियांची भेट घेऊन हरिवंशराय बच्चन यांची तब्येतीची विचारपूस केली. निवासस्थानीच मुलायमसिंह यादव यांनी हरिवंशराय बच्चन यांना ‘यशभारती सन्मान’ पुरस्कार प्रदान केला.

मुलायमसिंह यांच्या आग्रहामुळेच अमिताभ बच्चन यांनी उत्तरप्रदेश राज्याचे ‘सदिच्छातून म्हणून काम केले.‌ अभिनेत्री आणि अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन या मुलायमसिंह यादव यांच्याच समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. समाजवादी पक्षाकडून त्या चौथ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

मुलायमसिंह यादव यांच्यावर चरित्रपट

मुलायमसिंह यादव यांच्या जीवनावर ‘मैं मुलायम सिंग यादव’ हा हिंदी चित्रपट तयार करण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुवेन्दू घोष यांनी केले होते.‌ अभिनेते अमित सेठी यांनी मुलायमसिंह यादव यांची भूमिका साकारली होती. अभिनेते मिथुन चक्रवर्ती याचा मुलगा मिमोह याने मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यांची, अभिनेत्री प्रेरणा सिंह यांनी मुलायमसिंह यादव यांच्या पत्नीची, अभिनेत्री झरिना वहाब यांनी मुलायमसिंह यांच्या आईची, अनुपम श्याम यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका केली होती.

यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर

तर प्रकाश बलबेटो (राम मनोहर लोहिया), गोविंद नामदेव चौधरी (चरण सिंह) या भूमिकेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.