‘आनंदवना’चे डॉ. विकास आमटे यांचा ८ नोव्हेंबरला अमृत महोत्सवी सत्कार – विविध कार्यक्रमाचे आयोजन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०३ :- आनंदवन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त येत्या ८ नोव्हेंबर रोजी आनंदवन-वरोरा (जिल्हा- चंद्रपूर) येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रम होणार आहेत.

हेही वाचा :- पुढील महिन्यात मुंबईत ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान

आनंदवन मित्र मंडळ महाराष्ट्र आणि डॉ. विकास आमटे अमृत महोत्सव सत्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार समारंभास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, डॉ. तात्याराव लहाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. विकास आमटे यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.

हेही वाचा :- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

सकाळी नऊ वाजता ७५ देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येणार असून सत्काराचा मुख्य कार्यक्रम दहा वाजता होणार आहे. दुपारी तीन वाजता आनंदवन मित्र मेळावा तर संध्याकाळी पाच वाजता आनंदवन निर्मित स्वरानंदवन वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांच्या गझल गायन कार्यक्रमाने सत्कार सोहळ्याची सांगता होणार आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published.