आनंदनगर वीज डीपीला लागली आग आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट उघद्या डीपीमुळे नागरिकांच्या जिवितेला धोका.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२६ – आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून तापमान दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे विविध ठिकाणी जंगल, वने, कच-याचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी अचानक आग लागन्याचे प्रकार घडतात.उरण शहरातील आनंदनगर कॉर्नर वरिल लिबर्टी पार्क(सोसायटी)जवळील उरण नगर परिषद हद्दीतील वीज महावितरणच्या एका डीपी ला दि 26/3/2019 रोजी सकाळी 7:30 वाजता अचानक आग लागली. व आगीने काही क्षणात रुद्र रूप धारण केले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरि ही आग डीपी वर वाढलेले झाड़ी झुडपे व कच-यामुळे लागली असल्याचे सांगत या आगीला उरण नगर परिषद व वीज महावितरण कंपनी जबाबदार असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे.

डीपीला आग लागल्याचे समजताच आजु बाजुच्या जागरूक नागरिकांनी लगेचच वीज महावितरण, ONGC अग्निशामक दल, सिडको अग्निशामक दल, उरण नगर परिषद यांच्याशी त्वरित संपर्क साधला. संपर्क होताच आग लागल्याचे लक्षात येताच त्वरित सिडको, ONGC चे अग्निशामक दल, उरण नगर परिषदेचे नगरसेवक राजेश ठाकुर घटना स्थळी दाखल झाले.काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. सुदैवाने या घटनेमुळे कोणतेही जीवितहानीझाली नाही. होणारे नुकसान जागरूक नागरिकांमुळे टळले.मात्र या घटनेमुळे उरण तालुक्यातील तसेच उरण शहरातील उघद्या व दुर्लक्षित डीपीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उरण तालुक्यात तसेच उरण शहरात अनेक ठिकाणी विजेचे डीपी उघद्या अवस्थेत असतात तर काही डीपी वर झाडा झुडपां चे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे तिथे आगी लागन्याचेही प्रकार घडतात.त्यामुळे अश्या उघद्या डीपीमुळे लहान बालके तसेच इतर नागरीकांच्या जिवाला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात उरण तालुक्यात कोणतेही मोठी दुर्घटना होवु नये या अनुषंगाने वीज महावितरण कंपनीने तसेच उरण नगर परिषदेने विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे पदाधिकारी तथा शिवसेना रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email