मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेड्युलमध्ये नसलेली गळाभेट
राजधानी दिल्लीत ही भेटही झाली.
राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते. मंत्री मंडळातील सहकारी म्हणून तिघांनी एकत्र काम केले आहे.
विनोद तावडे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी ठाणे कोकण प्रभारी होते. त्यावेळी त्यांनी जव्हार आणि कल्याण येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात दोन मोठ्या मोर्चे काढले होते.
त्यावेळी ठाणे जिह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकात त्यांच्याकडे जबाबदारी असायची. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची ओळख जुनी आहे. राजकीय औपचारिक स्नेहापलीकडची त्यांची एकमेकांशी मैत्री आहे.
देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे पक्षातील एकमेकांचे जुने सहकारी आहेत. २०१४ च्या राज्यातील सत्ता बदलानंतर ते एकमेकांचे स्पर्धक होणे स्वाभाविक होते. पण, परस्पर मैत्रीत अंतर पडावे असे काही नाही.
राज्यातील नुकत्याच झालेल्या नाट्यपूर्ण सत्ता बदला नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट झाली. राजकीय चर्चेसह हास्यविनोद झाले असणार. गप्पा रंगल्या असणार. यातील त्या तिघांना जेवढे हवे तेवढे बाहेर येईल. बाकी “अंदाज अपना-अपना”
–मकरंद मुळे यांचा फेसबूक वॉल वरून साभार