अमितच्या निवडीने आश्चर्य अन् अत्यानंद, ‘राज’पुत्राला मायेचा प्रेमळ सल्ला

Hits: 1

मुंबई :- ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत भाषणातून भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा :- येवले’ची भेसळ उघड, चहामध्ये टाकत होता बंदी घालण्यात आलेला पदार्थ

दरम्यान, सर्वप्रथम मला राजसाहेबांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मी ठराव मांडणार असल्याचं त्यांनी मला काळ संध्याकाळी सांगितलं. पायाखालची जमीन सटकणं काय असतं हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला. त्यांचे खूप खूप आभार, असे अमित ठाकरेंनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले. येत्या दोन महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे आपण 14 वर्षं पकडूनच चालू. 14 वर्षांतलं हे पहिलं अधिवेशन असून, मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतो आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा हा खूप मोठा दिवस आहे, अशा भावना अमित यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा :- विठ्ठलवाडी स्मशानभूमितील मुडढ्यांवर मुतारी ; महापालिकेचा आणखीन एक धक्कादायक प्रकार !

अमितच्या भाषणावेळी त्यांच्या आई शर्मिला ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, अमितची नेतेपदी निवड झाल्याचा अत्यानंद आहे, असेही शर्मिला यांनी म्हटले आहे. मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे आभार मानेल. कारण, तो केवळ एक अहवाल वाचणार आहे, असंच आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आज त्याची नेतेपदी निवड झाल्यानं मला अतिशय आनंद झाल्याचं अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय. तसेच, नेता बनलेल्या आपल्या मुलाला मायेचा सल्लाही त्यांनी दिलाय. अमित गेल्या दोन-तीन वर्षात अनेक आंदोलनात सहभागी झालाय.

हेही वाचा :- प्रतीक गावडे खून प्रकरण अवघ्या २४ तासात तिघे आरोपी गजाआड कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

तेच त्यानं पुढे सुरू ठेवावं. नेतेपद असतं-नसतं, पण तुम्ही जेवढी जास्त लोकांची कामे करता, तेवढी लोकं जास्त तुमच्याशी जोडली जातात. आज महाराष्ट्रात खूप जटील प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न लोकांची कामं करा, लोक तुमच्या मागे येतील, असा मायेचा सल्ला शर्मिला यांनी आपल्या ‘राज’पुत्राला दिला आहे. राज ठाकरेंच्या अनेक सभा झाल्या, पण आम्ही कधीच व्यासपीठावर जात नाहीत. मात्र, आज त्याला व्यासपीठावर पाहून अन् बोलताना पाहून मला अंगावर काटा आला, डोळ्यात अश्रू आले, असे शर्मिला यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.