* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५० कोटींचा पाऊस पाडण्याचे अमिष; भोंदूबाबासह पाच भामटे ५६ लाख घेऊन पसार* – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५० कोटींचा पाऊस पाडण्याचे अमिष; भोंदूबाबासह पाच भामटे ५६ लाख घेऊन पसार*

*५० कोटींचा पाऊस पाडण्याचे अमिष; भोंदूबाबासह पाच भामटे ५६ लाख घेऊन पसार*

कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडेल या अमिषाला बळी पडून एका बांधकाम व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे भोंदूबाबासह ५ भामट्यांनी विकासकाच्या कार्यलयात काळी जादुच्या नावाने ५६ लाख रोकड घेऊन पसार झाले आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दावडी गावातल्या पाटीदार भवन येथे बांधकाम विकासकाच्या कार्यालय घडली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड, महेश आणि रमेश मोकळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. तर सुरेंद्र पाटील (वय ५१) असे फसवणूक झालेल्या बांधकाम विकासकाचे नाव आहे.

तक्रारदार सुरेंद्र पाटील हे चोळेगाव-ठाकुर्लीतील अनुसया बिल्डींगमध्ये कुटूंबासह राहतात. सुरेंद्र हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दावडी गावातल्या पाटीदार भवन येथे एका इमारतीमध्ये कार्यालय आहे.

याच कार्यलयात भोंदूबाबासह ५ भामट्यांनी त्यांना ५० कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले होते. याच आमिषला बळी पडून (शनिवारी) २५ जून रोजी सकाळच्या सुमारास सुरेंद्र यांच्या कार्यलयात या पाच जणांनी आपसात संगनमत करून कार्यलयात तंत्रमंत्र विद्या व काळी जादुच्या नावाने पूजा मांडली होती.

याच पूजेसाठी ५६ लाख रोकड ठेवण्याचे सुरेंद्र यांना या भामट्यानी सांगितले. त्यामुळे ५० कोटींचा पाऊस पडले या अमिषापोटी ५६ लाख रोकड ठेवली. त्यानंतर आरोपी गणेश, शर्मा गुरूजी आणि अशोक गायकवाड यांनी पूजापाठ सुरु असताना कार्यालय असलेल्या इमारतीला प्रदक्षिणा मारून येतो, असा बहाणा करून ५६ लाखांच्या रक्कमेसह पाचही आरोपींनी पळ काढला.

भादंवि कलम ४२० सह काळी जादू कलमानुसार गुन्हा दाखल – या प्रकरणी आपली फसगत झालेल्या सुरेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०६, ३४, सह नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ आणि अघोरी कृत्य प्रतिबंधक व काळा जादू नियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे सुरेंद्र यांना एकही आरोपीचे संपूर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. डी. गांगुर्डे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *