आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे उपचार, चाचण्या मोफत
मुंबई दि.०४ :- राज्यातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये यापुढे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व प्रकारचे उपचार तसेच चाचण्या मोफत करण्याचा तसेच नोंदणीसाठी (केस पेपर) दहा रुपये द्यावे लागणार नाहीत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालये आणि मनोरुग्णालये आदी २ हजार ४१८ आरोग्य संस्था आहेत.
‘बेस्ट’ उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
आरोग्यसेवेवर होणारा खर्च व त्यातुलनेत मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. ७० कोटी रुपये गोळा करण्यासाठी जी यंत्रणा वापरावी लागते तीच यंत्रणा आरोग्य विभागात अन्यत्र वापरता येईल हे लक्षात घेऊन सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून अमानुष मारहाण
प्रत्यक्षात रुग्णोपचारासाठी आकारण्यात येणारे दर अत्यल्प असल्यामुळे सरासरी वार्षिक उत्पन्न हे ७० कोटी रुपये एवढेच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तर रुग्णांकडून बाह्य रुग्णविभागात केस पेपर काढण्यापासून शस्त्रक्रिया वा विविध चाचण्यासाठी पैसे घेण्यासाठी जो कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात करण्यात येतो त्यापोटी सुमारे ७० कोटी रुपये खर्च येत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला.