सर्व विद्यार्थ्यांना फोटो कॉपी नि:शुल्क मिळावी – अभाविपची मागणी

सोबत महाविद्यालयानी रखडवलेली संलग्नीकरण शुल्क विद्यापीठाने वसूल करण्याची केली मागणी.

मुंबई विद्यापीठातील विविध समस्यां बाबत ABVP शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु व प्र कुलगुरु यांची घेतली भेट. यावेळी विद्यार्थांना त्यांच्या हक्काची उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मोफत मिळावी अशी मागणी शिष्टमंडळाने कुलगुरुकडे केली.


   मुंबई विद्यापीठ हे देशातील एक नावाजलेले सर्वात जुने विद्यापीठ आहे ह्या विद्यापीठाकडे सर्वांच्या नजरा लागेर असतात. विद्यापीठाने स्वीकारलेल्या ऑनलाईन पेपर तपासणी प्रक्रियेनंतर विद्यापीठ समस्यांचे घर झालेले आहे राष्ट्रीय रँकिंग (NIRF) मध्ये मागील वर्षी सर्वोत्कृष्ट १०० च्या आत असणार्‍या आपल्या विद्यापीठांनी यावर्षी सुधारणा आहे, तरी या विद्यार्थीकेंद्रित कारभार अजूनही दिसून येत नाही. इतक्या वर्षात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रवेश-परीक्षा-परिणाम या गोष्टी अजूनही सुरळीत नसल्याने विद्यार्थीवर्ग हैराण आहे. महाविद्यालयांच्या मनमानी कारभार व त्या विद्यापीठांच्या नसलेल्या अंकुशामुळे तर महाविद्यालय मोकळे रान तर दिले नाही ना असा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात उपस्थित केला जात आहे.

मुंबई विद्यापीठ कलिना कैम्पस मध्ये विद्यार्थ्यांना लाइब्ररी व वस्तिगृह मिळावेत अशा अनेक समस्यांना घेवून आज शिष्टमंडलाने कुलगुरुंची भेट घेतली. आम्ही जवळपास 21 मागण्या कुलगुरुंकड़े केल्या आहेत त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच याच शैक्षणिक वर्षात फोटोकॉपी विद्यार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी यावेळी कुलगुरुकडे केली असल्याची माहिती प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितली. तसेच या मागण्यावर विद्यापीठाने योग्य ती कारवाई न केल्यास ABVP आंदोलन करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

मागण्या पुढील प्रमाणे :

१) शासनाने घोषित केलेल्या प्राध्यापक भरतीबाबत विद्यापीठाचे धोरण आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया जाहीर करावी.
२) आगामी शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विद्यापीठाने वर्षाच्या सुरवातीला घोषित करावे आणि त्याची योग्य योजनेनुसार अंमलबजावणी करावी.
३) सर्वच शाखांचे निकाल ४५ दिवसात लावण्याची योजना करावी.
४) पुनर्मुल्यांकन आणि फोटोकॉपीचे निकाल १५ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना मिळावेत.
५) संपूर्ण परीक्षा विभाग ऑनलाईन होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपरची फोटोप्रत नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी.
६) विद्यार्थी तक्रार निवारण समिती त्वरित गठन करावी व ती पूर्णतः विद्यार्थी केंद्रित असावी.
७) सिनेटमध्ये पारित केलेल्या विद्यार्थी हितांच्या निर्णयांची अमलबजावणी त्वरित करण्यासाठी नियम आखावेत.
८) उत्तरपत्रिका घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करावी.
९) रत्नागिरी आणि ठाणे येथे असलेल्या उपकेंद्रावर पूर्णवेळ संचालकाची नेमणूक करावी.
१०) कल्याण येथील अडगळीत पडलेले उपकेंद्र नियमित चालू करून तेथे विविध अभ्यासक्रम चालू करावेत.
११) कोकणातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा विभागाशी निगडीत विभाग रत्नागिरी उपकेंद्रात त्वरित चालू करावा.
१२) विद्यापीठ शिक्षण शुल्क समितीच्या वतीने आर्व अभ्यासक्रमांच्या शुल्काची घोषणा त्वरित करण्यात यावी.
१३) नवीन विद्यापीठ नियमानुसार अभ्यासक्रम बनविताना विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे, त्यानुसार कारवाई व्हावी.
१४) विद्यार्थी परिषद निवडणुकांबाबत संबधित कर्मचारी व इतर घटकांशी चर्चा करून मार्गदर्शक तत्वे ठरवावीत.
१५) IDOL च्या मान्यतेचा घोळ त्वरित सोडवून पुढील प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करावी.
कलिना कॅम्पस :-
16) विद्यार्थ्यांना नियमित आवश्यक जवाहरलाल नेहरू ग्रंथालय लवकर सुरळीत चालू करावे अन्यथा अन्य अभ्यासिकेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.
17) रिकामी असलेल्या इमारती आणि मोकळ्या जागांबाबत विद्यापीठाची भूमिका काय आहे उदा.CENTER FOR EXCELLENCE IN BASIC SCIENCE ची वास्तू GUEST HOUSE साठी वापरात येऊ शकते असे अ.भा.वि.प. ला वाटते.
१8) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृहाचे गेल्या दोन वर्षापासून बांधकाम चालू आहे ते अजूनही पुर्ण झालेले नाही तरी ते पुर्ण करून येत्या शैक्षणिक वर्षापासून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
१9) अन्य भागातून येऊन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना कॅम्पस मध्ये राहता यावे यासाठी प्रलंबित १५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे काम त्वरित चालू करावे.
20) बांधून तयार असलेले INTERNATIONAL HOSTEL येत्या जून महिन्यापर्यंत परदेशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे.
21) सर्वच शैक्षिक शाखांमध्ये ढासळलेले प्रवेशाचे प्रमाण पाहून त्यावर त्वरित पावले उचलावीत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email