डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हुंकार रॅली

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / जातीय छळावणुकीतून आत्महत्या केलेल्या डॉ पायल तडवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ कल्याण पश्चिमेंच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते शिवाजी चौक दरम्यान सर्वपक्षीय हुंकार रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यात शिक्षण अधिकार मंच, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आदिनी भाग घेतला होता. ही हुंकार रॅली शिवाजी चौक येथे आल्यावर अनेक वक्त्यांनी भाषणे करून डॉ पायल तडवी यांची रॅगिंग केल्याने त्यांनी हत्या झाली नसून ही हत्याच असल्याचे सांगितले.

या पूर्वी रोहित वेमुला यांनी ही अशीच आत्महत्या केली होती.त्या मुळे शिक्षण क्षेत्रात मागासवर्गीय विद्यार्थाचा छळ केला जात असल्याचे दिसून येत असल्याचे या वेळी वक्त्यांनी बोलताना सांगितले. “जाती वाद से आजादी , धर्मवाद से आजादी मनूवाद से आजादी ” अश्या घोषना देत अनेक नागरिक व पक्षीय कार्यकर्ते हातात तक्त्या घेऊन सामील झाले होते.या रॅलीत कॉम्रेड उदय चौधरी, ऍड नितीन धुळे, कॉम्रेड दीपक अमृत सागर, डॉ गिरीश लटके, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, संकल्पना कराडे, रोहीनी जाधव आदी प्रमुख लोक सामील झाले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email