* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

मुंबई दि.०१ :- इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृह येथे आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील माहिती दिली. राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवर सर्वच नेत्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले.

नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन

आम्ही टिकणारे आरक्षण देणार असून सरकार सकारात्मक आहे. विरोधकांनी सकारात्मक राहिले पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते आपणही सरकारला मदत करणे अपेक्षित आहे. आम्ही आरक्षणांच्या बाजूने आहोत. सर्वोच्च न्यायालयात क्युरीटिव्ह पिटिशन दाखल केली असून लवकरच त्याची सुनावणी सुरू होईल, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ठाणे महापालिकेतर्फे येत्या १ ते ३ डिसेंबर दरम्यान पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहोत. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे आणि उपोषण मागे घ्यावे, आदी ठराव या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *