अजित पवारांनी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केली : संजय राऊत

मुंबई दि.२४ :- शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. या सर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेच्य संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत जळजळीत टीका केली. अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असं म्हणत त्यांच्याविरोधातही राऊतांनी नाराजीचा सूर आळवला. ‘राज्याचे मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतात आणि राज्यातील जनतेला याची साधी कल्पनाही नाही. सकाळी जेव्हा जाग येते, तेव्हा हा सारा प्रकार समोर येतो’, असं म्हणत हा प्रकार खेदजनक असल्याचं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

हेही वाचा :- डोळ्यांदेखत कांद्याची झाली माती..

अजित पवार यांनी नेलेल्या बनावट कागदावरुन सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी आमदारांना फसवून राजभवनात नेले होते. शिवसेना-राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली जाते. तर भाजपला ८ दिवसांची मुदत दिली जाते. यातूनच सर्व समजते, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही १० मिनिटांत सर्व १६५ आमदार परेडसाठी राजभवनात नेऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवार हे लोकनेते आणि देशाचे नेते असल्याचे ते म्हणाले. भाजपला मी चांगला व्यापारी समजत होतो. पण त्यांनी व्यापार सचोटीचा केला असता, प्रामाणिकपणे केला असता तर त्यांना असे दारोदारी फिरावे लागले नसते.

हेही वाचा :- शिवसेना आणि राष्ट्रवादी, पत्त्यांचा क्लब, ; राज ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही तोडफोडीच्या मार्गाने सरकार स्थापन करणार नाही, असं म्हणत शिवसेना आणि मित्र पक्षांची पुढील भूमिका काय असेल, यावरुन पडदा उचलला. या साऱ्या प्रकारात शरद पवारांचं नाव चुकीच्या पद्धतीने उचललं जात असल्याचं पाहून, हा भाजपचा डाव असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. खोटं बोलण्यात भाजपचा हात कोणीही पकडू शकत नाही या शब्दांत भाजपच्या भूमिकेला खेट आव्हान देत धमक्यांच्या चर्चांवरही त्यांनी प्रकाश टाकला. ‘संजय राऊत घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही तुम्हाला घाबरवून पळवून लावू. कारण, स्वत:च्याच पेचात भाजप अडकली आहे. अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना फसवलं, आता त्यांना भाजप फसवणार’, असं म्हणत राऊतांनी शिवसेनेच्याच शैलीत झाल्या प्रकारावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email