दीड वर्षांची झुंज अखेर संपली पत्रकार अजित पाटील यांना मातृशोक

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२२ – उरणच्या खोपटे पाटील पाडा गावातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रा.र.पाटील गुरुजी यांच्या सुविद्य पत्नी तथा उरणमधील पत्रकार अजित पाटील यांच्या मातोश्री सौ.निलम (यमुना) रामनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी काल दिनांक 20 मार्च रोजी निधन झाले आहे. मागील सुमारे दीड वर्ष त्या फुफ्फुसाच्या आजाराने पिडीत होत्या. अनेक प्रकारचे उपचार करूनही त्याचा कोणताही फायदा न होता काल होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी देवाज्ञा झालेल्या सौ .निलम पाटील या अतिशय मृदू भाषी आणि सतत हसऱ्या चेहऱ्याच्या म्हणून त्या परिचित होत्या. खोपटे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

हेही वाचा :- ऐन सुट्टीच्या काळात क्रीडा संकुल बंद बुधवारी घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम

यावेळी अंत्ययात्रेत जे एन पी टी चे विश्वस्त दिनेश पाटील , काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर ,उरण सामाजिक संस्थेचे सचिव तथा कामगार नेते संतोष पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , सामाजिक , पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी 29 मार्च रोजी आणि बाराव्याचा कार्यक्रम शनिवारी होणार आहे . स्व निलम पाटील यांच्यामागे पती रा र पाटील , तीन मुले व सुना , एक विवाहित मुलगी आणि जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतीशय प्रामाणिक आणि संपूर्ण कुटूंबाचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते . त्यांच्या आजारावर यवतमाळ , मालवण , बेंगलोर , आंबोली घाट आदी अनेक ठिकाणावरून अनेक औषधे आणण्यात आली होती मात्र दीड वर्षांची मेहनत फुकट जात त्यांचे निधन झाल्याने पाटील कुटूंबियांवर दुखखाचा डोंगर कोसळला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email