हवाई दलाच्या कर्मचारी विभागाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल राकेश कुमार सिंग भदुरिया यांनी स्वीकारला कार्यभार
नवी दिल्ली, दि.०२ – एअर मार्शल राकेश कुमार सिंग भदुरिया यांनी आज हवाई दलाच्या कर्मचारी विभागाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. भदुरिया राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून 15 जून 1980 रोजी ते हवाई दलाच्या लढाऊ विमान विभागात दाखल झाले. त्यांना 26 प्रकारची लढाऊ तसेच मालवाहतूक करणारी विमानं उडवण्याचा 4 हजार 250 तासांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक तसेच वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
Please follow and like us: