Air India ; वैमानिक विमान सोडून आला धावपट्टीवर!
मुंबई दि.१९ :- एअर इंडियाचे भुवनेश्वर-मुंबई हे विमान बुधवारी रात्री विलंबाने मुंबईत आले. विमान धावपट्टीवर उतरविल्यानंतर या वैमानिकाने ते टर्मिनल २ जवळ प्रवासी उतरतात त्या ठिकाणी पार्क केले. पण प्रवासी व त्यांचे सामान विमानातून खाली उतरण्यास वेळ लागला. त्यादरम्यान या वैमानिकासह क्रू सदस्यांची कामाची वेळ संपली.
हेही वाचा :- पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू
यामुळे वैमानिक तातडीने खाली उतरला व धावपट्टीजवळून पायी जाऊ लागला. हवाई नियंत्रण कक्ष व अन्य यंत्रणांनी तातडीने दखल घेत त्याला तेथून बाजूला केले. यानंतर एअर इंडियाने कडक कारवाई करत वैमानिकाला निलंबित केले. कामाची वेळ संपली म्हणून विमान सोडून धावपट्टीजवळून पायी जाण्याचे कारण काय? हे मात्र कळू शकले नाही.
डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?