अभियंते पाटील यांच्यावरील हल्ल्याचा पालिका अधिकारी कर्मचारी करणार निषेध
डोंबिवली दि.२४ – पालिकेच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर ऐन गर्दीच्या वेळेस स्काय वोकवर जो शुक्रवार 22 रोजी हल्ला झाला त्याला 48 तासापेक्षा जास्त काळ होऊनही अजून आरोपींना पकडण्यात आले नाही हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी अधिकारी कर्मचारी उद्या सोमवारी करणार आहेत
सध्या निवडणुकीची आचार संहिता असल्याने कोणतेही आंदोलन केले जाणार नाही मात्र सर्व कर्मचारी अधिकारी “काळ्या फिती “लावून निषेध करणार आहेत या हल्ल्यामुळे पालिकेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे उद्या सकाळी 11 वाजता सर्वजण कल्याण मुख्यालयाच्या प्रवेश दाराजवळ एकत्र येणार आहेत सुरवातीला आयुक्त गोविद बोडके यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार आहेत अधिकारी कर्मचारी एकत्र येत असल्याने उद्या कल्याण व डोंबिवली पालिकेचे कामकाज बंद रहाण्याची चिन्हे आहेत नंतर सर्वनाधिकारी कर्मचारी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेणार आहेत
दरम्यान ,रेल्वेच्या हद्दीत सी सी ती व्ही केमेरिअसले तरी पालिकेने बांधलेल्या स्कायओकवर ते नाहीत म्हणून तातडीने पूर्व पश्चिमेला स्कायवावकवर केमेरे बसवण्यात यावे अशी मागणी आता कर्मचारी करत असून आयुक्त बोडके यांना तसे निवेदन देण्यात येईल असे सांगण्यात आले व नंतर पोलीस उपायुक्तांना भेटणार आहेत